Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

Kalyan News : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस उघडकीस झाला आहे. हॉटेलच्या जेवणात मेलेलं झुरळ आढळलं. यानंतर ग्राहकाने संताप व्यक्त केला.

Vishal Gangurde

कल्याणमधील रामदेव हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची घटना

बीएमसी अधिकारी निकिता जाधव यांच्या मुलीने पार्सलमधून घेतलेलं जेवणात आढळलं झुरळ

हॉटेल मालकाने गंभीरता न दाखवता जेवण बदलून देण्याचीच दाखवली तयारी

या घटनेनंतर हॉटेलच्या अन्न सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमधील नामांकित रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस समोर आला आहे. याआधी जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता. त्यानंतर आता फ्राईडराईसमध्ये मेलेलं मोठ झुरळ आढळलं आहे. त्यामुळे हॉटेल नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याची बाब समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

बीएमसीच्या अधिकारी निकिता जाधव या आपल्या मुलीला पार्सल जेवण (Food) घेऊन गेल्या. तर पार्सल घेतलेल्या जेवणामध्ये मोठ झुरळ आढळलं. त्यांनी घडलेला प्रकार हॉटेलात येऊन मालकाला सांगितला. पण हॉटेल मालकाने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार माध्यमांना कळविला. त्याचबरोबर माझ्या मुलींनी तो फ्राईडराईस खाल्ला आहे. तिला जर काही झाले असते तर, असं म्हणत हॉटेलच्या कारभारावर सवाल उपस्थित केला आहे.

या प्रकारानंतर माध्यमांनी हॉटेल व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. एकंदरीत ही घटना बघता कल्याणातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

बीएमसीच्या अधिकारी निकिता जाधव काय म्हणाल्या?

बीएमसीच्या अधिकारी निकिता जाधव म्हणाल्या की, 'मी हॉटेलमध्ये आली होती. हॉटेलमधून फ्राईड राईस मागवला. घरी जाऊन जेवायला सुरुवात केल्यानंतर मुलीला त्यात झुरळ आढळला. मी लगेच डबा बंद केला. हॉटेल मालकाला दाखवला. मात्र, हॉटेल मालकाने (Hotel Owner) जेवण बदलून देऊ सांगितले. हॉटेलचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आम्ही त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

SCROLL FOR NEXT