BMC News Saam Digital
मुंबई/पुणे

BMC News : चंदनवाडी भागात सोने-चांदी गाळणाऱ्या १२ भट्टीवर पालिकेची कारवाई, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Mumbai Pollution : चंदनवाडी सी विभागातील पटवा चाळ, तेली गल्ली या नागरी वस्त्यांतील सोने-चांदी गाळणाऱ्या व्यावसायिकांच्या १२ भट्टी, धुराड्यांवर पालिकेने कारवाई केली.

Sandeep Gawade

BMC News

चंदनवाडी सी विभागातील पटवा चाळ, तेली गल्ली या नागरी वस्त्यांतील सोने-चांदी गाळणाऱ्या व्यावसायिकांच्या १२ भट्टी, धुराड्यांवर पालिकेने कारवाई केली. वायुप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे सी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी दिली.

पालिकेतील वायुप्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू आहे. पालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार महापालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांत उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. व्यापक आरोग्य हित लक्षात घेता वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवरही महापालिका प्रशासन कठोर कारवाई करत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नागरी वस्‍तीत सोने- चांदी वितळवणाऱ्या आणि आम्ल भट्टींवर (ॲसिड फर्नेस) पालिकेच्या सी विभाग कार्यालयअंतर्गत इमारत आणि कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली येथील सोने-चांदी गाळणाऱ्या व्‍यावसायिकांचे एकूण १२ धुराडे (चिमणी) काढण्यात आले. अशा प्रकारची कार्यवाही यापुढेही सुरू राहणार आहे, असे चंदनशिवे यांनी सांगितले.

रासायनिक धुरामुळे आरोग्यावर परिणाम

सोने-चांदी गाळणाऱ्या व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरूपाचा कारखाना असतो. यात सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी, धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने पालिकेने वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्‍यावसायिकांविरोधात कारवाई सुरू केली आहे, असे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आक्षेप - भुजबळ

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT