Kishori Pednekar Saam Tv
मुंबई/पुणे

Mayor Kishori Pednekar: PPE किट घालून महापौर कोव्हिड केंद्रात, रुग्णांची विचारपूस

मुंबई पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वेगवेगळ्या कोव्हिड केंद्रात जाऊन महापालिकेने केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वेगवेगळ्या कोव्हिड केंद्रात जाऊन महापालिकेने केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. महापौरांनी स्वत: पीपीई किट घालून कोव्हि़ड केंद्रातील रुग्णांची विचारपूस केली. तसेच, वॉररुम, कोव्हिड वॉर्डात यंत्रणा कशी कार्यरत आहे, याची त्यांनी पाहणी केली (BMC Mayor Kishori Pednekar Inspected The Arrangements In COVID Center).

बीकेसीत सध्या 2 हजार 500 बेड्सची उपलब्धता - महापौर

ग्राऊंड रिॲलिटी काय आहे? हे बघण्यासाठी आले होते. घाबरुन जाऊ नये. बीकेसीत सध्या 2 हजार 500 बेड्सची उपलब्धता आहे. त्यापैकी 108 हे आयसीयू बेड आहेत, 12 बेड हे डायलिसीसचे आहेत. 1 हजार 300 बेड्स विना ऑक्सिजनचे आहेत. तर 890 ऑक्सिजनचे आहेत. आज आपल्याकडे 950 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 670 रुग्ण हे विना ऑक्सिजनचे आहेत, जी चांगली बाब आहे. 280 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. आपल्याकडे बीकेसीत एकही आयसीयूतील रुग्ण नाही, अशी माहिती किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली.

विरोधकांनी चुकीचे मॅसेज देऊ नये - महापौर

20 हजार रुग्ण झाले ते लक्षणे नसलेली. काल आयुक्तांचं म्हणणं तेच आहे. लक्षणे असलेली रुग्ण कमी दिसत आहेत. मी पहिलेपासून घाबरवलं नाही, मी सतत म्हणत आहे घाबरु नका, मात्र काळजी घ्या. घरात बसायचं आणि आकडे लावत सुटायचे असं आहे का? हे खरंच ते दाखविण्याचा प्रयत्न करतोय. अर्थाचा अनर्थ करत विरोधकांनी चुकीचे मॅसेज देऊ नये.

20 हजार रुग्ण जर लक्षणे असलेली जास्त आढळले असते, बेड्स अधिक रिक्त आहे. डेंजर झोनमध्ये आपण नाही. गर्दी होतायेत, ज्या पद्धतीनं लोकांना उकसवलं जातंय. आम्ही असं कधीच म्हणत नाही आहे लॉकडाऊन होणारच. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नका. विरोधक लोकांना उकसवत आहेत.

आशिष शेलारांला धमकी येत असेल तर ते चुकीचं - महापौर

विरोधक आणि सत्ताधाऱ्यात वैचारीक मतभेद असले तरी कोणी असं जीवावर उठू नये. त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणं चुकीचं. महाराष्ट्रात चुकीची संस्कृती वाढू नये. आशिष शेलारांला (Ashish Shelar) धमकी येत असेल तर ते चुकीचं आहे. विकृत स्वभावाच्या लोकांनी हे थांबवावे, मी स्वत: पोलीस आयुक्तांशी याबाबत बोलणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT