BMC Gen Z Fellowship selection process faces questions as students seek transparency  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : बीएमसीच्या जेन झी फेलोशिपमध्ये घोळ? 150 जणांची निवड, गुण मात्र गुलदस्त्यात

Mumbai News : बीएमसी जेन झी फेलोशिपच्या निवड प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 150 विद्यार्थ्यांची निवड झाली, मात्र गुण आणि टक्केवारी जाहीर न केल्याने पारदर्शकतेवर सवाल उपस्थित होत आहेत.

Alisha Khedekar

  • बीएमसी जेन झी फेलोशिप परीक्षेला सुमारे 1,500 विद्यार्थी बसले

  • दुसऱ्या फेरीसाठी 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली

  • निवड झालेल्या तसेच 1,404 अपात्र विद्यार्थ्यांचे गुण जाहीर न केल्याने प्रश्न उपस्थित

  • फेलोशिप परीक्षेसाठी 500 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले

सुप्रीम मस्कर, मुंबई

मुंबई महापालिकेनं तरुणांसाठी जेन झी फेलोशिप जाहीर केली होती. जवळपास 1500 विद्यार्थी या परीक्षेला प्रत्यक्ष बसले. मात्र दुसऱ्या फेरीसाठी 150 विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र यादीत विद्यार्थ्यांचे मार्क किंवा टक्केवारी जाहीर न करता. केवळ नावचं जाहीर त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी 150 विद्यार्थ्यांची निवड नेमकी कोणत्या निकषांखाली झाली, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान ज्या 1404 विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले. त्यांचीही गुणपत्रिका पालिकेनं जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्रमवारी कशी ठरवण्यात आली? गुणवत्ता यादीत प्रथम कोणते 150 विद्यार्थी आहेत? हे कसं ठरवण्यात आलं, असा प्रश्न उपस्थित होतोय.. या फेलोशिप परीक्षेचं प्रवेश शुल्क म्हणून 500 रुपये आकारणी करण्यात आली होती. मात्र गुणांची टक्केवारी जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

काय आहे जेन झी फेलोशिप?

महाराष्ट्रात सगळीकडे Gen Z तरुणाईचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जेन झी युवकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले. त्यातच मुंबई महापालिकेनेही या जेन झी तरूणांना विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केले आहे. सीएम फेलोशिपच्या धर्तीवर महापालिकेनं बीएमसी जेन झी फेलोशिप जाहीर केली. या BMC GEN Z Fellowship Program अंतर्गत महापालिकेने युवा पिढीला महापालिकेच्या कार्यकक्षेत काम करण्याची संधी देण्याचं आश्वसन दिलं. ज्यात शिक्षण, नेतृत्व, नवनिर्मितीची संधी या युवकांना मिळणार होती.

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची कार्यपद्धतीही त्यांना समजून घेता येणार आहे. सोबतच धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधून महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काम करता येणार होते. मात्र निवड प्रक्रियेतील घोळामुळे महापालिकेची ही फेलोशिप चर्चेचा विषय ठरलीय. आता महापालिका प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नानांची अकाली ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी- मुख्यमंत्री

Nana Patekar: लहानपणी होते ऑफ-स्पिनर, विराट कोहली बाद झाला की सोडायचे जेवण; नानांचं क्रिकेटवर होतं प्रचंड प्रेम

Nana Patekar : मुरूडच्या किनाऱ्यापासून अभिनयाच्या शिखरापर्यंत... असा राहिला भारतीय सिनेसृष्टीच्या 'नटसम्राट'चा जीवनप्रवास

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता UPIद्वारे काढता येणार PFचे पैसे; जाणून घ्या नवी सुविधा

Navratri 2026: नवरात्रीत रोज दिसा हटके! नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी परफेक्ट लूक आयडिया

SCROLL FOR NEXT