BMC Saam Tv
मुंबई/पुणे

पालिकेचा 'फूड ऑन व्हील' उपक्रम; लवकरच ५० 'फूड ऑन व्हील' स्टॉल सुरू होणार

स्टॉल उभे करताना अटी, नियम देखील असणार आहेत. स्टॉल उभारण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि विव्रेत्यांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे. फूड ट्रकचालकांना सकस संतुलित आहार देण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - पालिकेने 'फूड ऑन व्हील' उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) आता लवकरच ५० 'फूड ऑन व्हील' स्टॉल सुरू होणार आहेत. बेरोजगार, महिला बचतगट, गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्याससाठी पालिकेने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या (BMC) विधी समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेच्या अमलबजावणीसाठी पालिकेच्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पालिका समिती गठीत करणार आहे. समितीत विभागीय वाहतूक उपायुक्त, पोलीस उपायुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागातील सहाय्यक आयुक्त, विभागीय उपकार्यकारी आरोग्य अधिकारी असतील.

हे देखील पहा -

ही समिती या जागा निश्चित केल्यानंतर परवानगी देणार आहे. स्टॉल उभे करताना अटी, नियम देखील असणार आहेत. स्टॉल उभारण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि विव्रेत्यांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे. फूड ट्रकचालकांना सकस संतुलित आहार देण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधितांना आहारतज्ञांबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

हे स्टॉल उभारल्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. स्टॉल मिळवण्यासाठी अर्जदार जास्तीत जास्त दोन स्पॉट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. या स्टॉलसाठी आरोग्य परवाना शुल्क पाच हजार, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी प्रतिवर्ष 20 हजार शुल्क तर प्रत्येक स्टॉलसाठी अनामत शुल्क एक लाख रुपये आकारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT