Manoj Sansare no more Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Sansare no more: लढवय्या नेता हरपला! मनोज संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा

Manoj Sansare no more: महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.

Vishal Gangurde

Mumbai News: महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती.

मनोज संसारे यांची झुंजार नेते म्हणून लोकांमध्ये ओळख होती. संसारे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष' स्थापन केला होता. मनोज संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

मनोज संसारे गेल्या वर्षभरापासून आजारी होते. मनोज संसारे हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. तसेच 'युथ रिपब्लिकन पार्टी'चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

मनोज संसारे यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

मनोज संसारे यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनोज संसारे यंच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संसारे यांनी श्रद्धांजली वाहिली.

जितेंद्र आव्हाड श्रद्धांजली वाहताना म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेवून अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते व मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक मनोज भाई संसारे यांचं आज दुःखद निधन झालं. संसारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली'.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर श्रद्धांजली वाहताना म्हणाले, आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार सेनानी, माझा हितचिंतक आणि पाठीराखा मनोजभाई संसारे यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : घरातील काचेचे बाल्कनी दरवाजे लवकर घाण होतात? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

थंडीचा कडाका; शाळांच्या वेळेत मोठा बदल, पालिकेने काय निर्णय घेतला? VIDEO

Pune : "प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT