BMC Election  Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

BMC Election update : नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यामुळे शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांचा डोळा मुंबई मनपाच्या स्थायी समितीवर आहे. मात्र भाजप त्यासाठी तयार नाही. महायुतीत मुंबईच्या जागावाटपाचं घोडं अडलेलं आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

नगरपालिका निवडणुकीत मोठ यश मिळवल्यानंतर भाजप आणि शिंदेसेना आता मुंबई महापालिकेसाठी सज्ज झाली आहे. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत 53 नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे शिंदे सेनेची आगामी मनपा निवडणुकीसाठी बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातला मुंबईतला जागावाटपाचा तिढा कायम आहे.

100हून अधिक जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरलाय. मात्र भाजप 80 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. आतापर्यंत 175-180 जागांवर सहमती झालीय. तर अजून 45 ते 50 जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दुसरीकडे किमान 3 वर्षे स्थायी समिती अध्यक्षपदाचा आग्रह शिंदेसेनेने धरलाय. मात्र महापौरपद आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिंदे सेनेकडे देण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे या दोन महत्वाच्या पदावरुनही रस्सीखेच सुरु आहे.

नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यामुळे शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांचा डोळा बीएमसीच्या स्थायी समितीवर आहे. देशाची आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना दोन्ही पक्ष सरसावले आहेत. दुसरीकडे ठाकरे बंधुंसाठीही ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँण्डला टक्कर देण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेत काय तडजोड होते ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT