BJP BMC Saam Tv News
मुंबई/पुणे

BMC elections: आगामी BMC निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, उत्तम मुंबई घडवण्यासाठी आखला मोठा प्लान

BJP promises for Mumbai development: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई घडवण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Bhagyashree Kamble

संजय गडदे, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. यासाठी नेते मंडळीनीही कंबर कसली आहे. राज्यातील नेत्यांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणीलाही सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचं शिर्डीत अधिवेशन पार पडलं होतं. आता मुंबईतही भाजपच्या नेत्यांनी कामाला सुरूवात केली आहे. अशातच भाजपचे खासदार पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईत नवा प्लान आखला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई घडवण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई घडवण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे. लोककल्याण कार्यालयातून हा संकल्प आम्ही आणखी पुढे घेऊन जाणार आहोत. एकही व्यक्ती नोकरी आणि रोजगाराविना राहणार नाही. सर्वांना आहे त्याच ठिकाणी घर देताना वीज, पाणी तसेच स्वयंपाकाच्या गॅससह सर्व सुविधा पुरवू', असे आश्वासन खासदार पीयूष गोयल यांनी यावेळी दिले.

ज्येष्ठ भाजपा नेते वेदप्रकाश गोयल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या कांदिवली येथे लोककल्याण या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी पालकमंत्री ॲड. आशीष शेलार, सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, प्रविण दरेकर, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, विजयभाई गिरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जनता आणि कार्यकर्त्यांसाठी सुरू होत असलेले लोककल्याण कार्यालय हा जनता आणि भाजपामधील सेतू आहे आणि येथून जनतेची समस्यांमधून सुटका होईल, असा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. तसेच उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई घडवण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'भाजपा हा ज्येष्ठ आदरणीय नेते वेदप्रकाश गोयल यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांचा पक्ष आहे. या नेत्यांनी तडजोडीचे राजकारण कधीच केले नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेत खासदार पीयूष गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयातून जनतेच्या सेवेचा वसा सुरूच राहिल', अशी खात्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT