Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Shivsena Thackeray Group: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या महिला नेत्याने आणि पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे भांडुपमध्ये ठाकरेसेनेला मोठं खिंडार पडले.

Priya More

Summary -

  • बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला

  • माजी नगरसेविका दिपाली गोसावी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला

  • तिकीट नाकारल्यामुळे दिपाली गोसावी नाराज होत्या

  • दिपाली गोसावींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

  • त्यांनी राजीनामा देताच महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. भांडुपमध्ये नारज झालेल्या माजी नगरसेविका दिपाली गोसावी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दिपाली गोसावी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होत त्यांच्यासोबत महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले.

भांडुपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वार्ड क्रमांक १०९ च्या महिला पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. अपक्ष उमेदवार दिपाली गोसावी यांना समर्थन दिले आहे. दिपाली गोसावी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल असं सांगण्यात आलं. परंतू पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी सुरेश शिंदे यांना उमेदवारी दिली.

शिवसेना ठाकरेसेनेने दिपाली गोसावी यांना उमेदवारी देऊ असे सांगून ऐन वेळी उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या दिपाली गोसावी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता याच वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश शिंदे आणि अपक्ष उमेदवार दिपाली गोसावी यांच्यामध्ये 'काँटे की टक्कर' होणार आहे. दिपाली गोसावी यांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीसोबत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. या सर्वांनी राजीनामे देत दिपाली गोसावी यांना पाठिंबा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT