Eknath Shinde’s Delhi visit and the 50-50 seat-sharing demand spark tension in the Mahayuti alliance before Mumbai BMC elections. saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

BMC Election Mahayuti: मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे गटाने भाजपकडे ५०-५० जागांची मागणी केली आहे. या निर्णयामुळे महायुती आघाडीतील तणाव वाढला आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bharat Jadhav

  • शिंदे गटाने मुंबई महापालिकेत ५०-५० जागावाटपाची मागणी केली आहे.

  • मुंबई महापालिकेची सदस्यसंख्या २२७ इतकी आहे.

  • भाजप शिवसेनेला ६५ ते ७० जागा देण्यास इच्छुक

महायुतीत नाराज असलेले एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचदरम्यान शिवसेनेनं भाजपकडे मोठी मागणी केलीय. शिवसेनेची ही मागणी ऐकून राज्यातील महायुतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिंदे गट शिवसेनेने मुंबई महापालिकेत ५०-५० जागांची मागणी केलीय. इतकेच नाही तर ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही आहे. दरम्यान मुंबई महापालिकेची सदस्यसंख्या २२७ इतकी आहे.

शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीत समसमान जागा वाटपासाठी आग्रह धरण्यात आलाय. तर दुसरीकडे भाजप मुंबईस महापालिकेत १५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर भाजप शिवसेनेला ६५ ते ७० जागा देण्यास इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेने केलेली मागणी भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

विजयाची खात्री असलेल्या जागा लढवू अशी भूमिका एकनाथ शिंदेंची आहे. भाजप महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि रामदास आठवले यांच्या आरपीआय काही जागा दिल्या जाऊ शकतात अशा चर्चा सुरु आहेत.

असा आहे लोकसभा आणि विधानसभेतील निकाल

शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत मुंबईत एका जागेवर विजय मिळवली होती. तर भाजपला देखील एका जागेवर विजय मिळाली होीती. तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत १५ जागा लढल्या होत्या आणि त्यांना ६ जागांवर विजय मिळाला होता. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवल्या होत्या. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या होत्या.

तर भाजपनं ८२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आणि काँग्रेसमधून माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT