शासकीय कामातील संथपणा, ठेकेदारांचा मस्तवालपणा, कामाचा दर्जा यावर अगदी परखडपणे बोलणा-या नितीन गडकरींनी भाजपमधील इनकमिंगवरुनही प्रदेश नेतृत्वाचे कान टोचलेत.जुना कार्यकर्ता म्हणजे "घर की मुर्गी दाल बराबर" तर बाहेरून आलेले "सावजी चिकन मसाला".. अशी टिप्पणी त्यांनी केलीय. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदच व्यक्त झाली आहे.
भाजपमधील आयारामांवर भाष्य करण्याची गडकरींची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी राज्यातील नेत्यांना टोला लगावला होता. कोणाचा वापर करून गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला फेकून देऊ नका, असं सांगून जुन्या कार्यकर्त्याचं महत्व अधोरेखीत केलं होतं. 2014, 2019, 2024 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले होते. आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गडकरींच्या या ताज्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. भाजपमध्ये 80 टक्के बाहेरचे लोक असल्याचा टोला ठाकरे सेनेने लगावलाय.
सोलापूरमध्ये नुकतेच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुंबई महापालिकेसह जिल्हा परिषदांमध्ये भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी इतर पक्षातील नेत्यांसाठी भाजपनं आपली दार सताड उघडंल्याने जुन्या जाणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आहे. आता गडकरींनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाचे कान टोचल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना भाजपश्रेष्ठी जपणार का ? की सत्तेच्या लालसेने येणाऱ्या आयारामांचंच कौतुक करणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.