Raj Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Major Setback for Raj Thackeray In Mumbai: मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला. अंधेरीतील मनसेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीत मनसेला खिंडार पडलं.

Priya More

Summary -

  • मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मनसेला मोठा धक्का

  • अंधेरी पूर्वमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

  • आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत सर्वांनी केला पक्षप्रवेश

  • मुंबईमध्ये शिंदेगटाची ताकद वाढली

संजय गडदे, मुंबई

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेला एकापोठापाठ एक धक्के बसत आहेत. मनसे नेते संतोष धुरी आणि हेमंत कांबळे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. संतोष धुरी यांनी भाजपमध्ये तर हेमंत कांबळे यांनी शिंदेसेनत प्रवेश केला. या धक्क्यातून सावरत नाही तोवर मनसेला मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठं भगदाड पडलं. अंधेरीत मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदेसेनेचा भगवा हाती घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुक प्रचार रंग चढला असतानाच मनसेतून इतर अन्य पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे अंधेरीत मनसेची ताकद कमी झाली. तर शिंदेगटाची ताकद वाढली आहे.

४ ते ५ दिवसांपूर्वी मनसेचा अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता. यानंतर अंधेरीत मोठ्या संख्येमध्ये मनसेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे अंधेरीतील शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांच्या मताधिक्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Til Barfi Recipe : मकर संक्रांतील पाहुण्यांसाठी खास बनवा तिळाची मऊसूत बर्फी, वाचा सिंपल रेसिपी

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Priyanka Chopra Photos : डोळ्यात आग अन् रक्ताने माखलेले शरीर; 'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा खतरनाक लूक समोर, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT