BMC News Saam TV
मुंबई/पुणे

BMC News: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता नाल्यांमध्ये कचरा टाकणं पडेल महागात, BMC करू शकते कारवाई

Mumbai News: मुंबईकरांच्‍या उत्‍तम, निरोगी आरोग्‍यवर्धनासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम' सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रस्‍ते, पदपथ, गटर आणि नाल्‍यांची स्‍वच्‍छता केली जात आहे. ज्‍या ठिकाणी स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News:

मुंबईकरांच्‍या उत्‍तम, निरोगी आरोग्‍यवर्धनासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम' सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रस्‍ते, पदपथ, गटर आणि नाल्‍यांची स्‍वच्‍छता केली जात आहे. ज्‍या ठिकाणी स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात आली आहे. त्‍या ठिकाणी परिसरात नागरिकांनी पुन्‍हा कचरा टाकू नये, असं आवाहन बीएमसीने केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर अशी दंडात्मक कारवाई करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून 'संपूर्ण स्वच्छता मोहीम' सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कार्यवाही केली जात आहे. परिणामी, अवघ्या पंधरा दिवसात एकूण १०४२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), १३९ मेट्रिक टन घनकचऱयाचे अतिरिक्त संकलन करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यासाठी ३७०० कामगार - कर्मचाऱयांनी अविरत श्रमदान केले आहे. मनुष्यबळाबरोबरच जेसीबी (३३), डंपर (१४८), कॉम्पॅक्टर (२१), फायरेक्स मशीन (७१), वॉटर टँकर (६९), सक्शन मशीन (६), लिटर पीकर मशीन (३), रोड स्वीपिंग मशीन (९) आणि मिस्टिंग मशीन (७) याप्रमाणे एकूण ३६७ संयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

या मोहिमेदरम्यान स्वच्छता झाल्यानंतर मुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचर्‍यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्‍या तरंगत्‍या वस्‍तुंचा (फ्लोटिंग मटेरिअल) समावेश आहे.

अशा स्वरुपाचा कचरा नाल्यात टाकत असल्याने सांडपाणी वहन, निचरा होण्‍यास अडथळे निर्माण होतात. महानगरपालिकेच्‍या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वय साधून हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, यादृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढण्‍याचे काम नियमितपणे सुरू आहे. नाल्‍यांमध्‍ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्‍यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करत आहे. प्रायोगिक तत्‍त्‍वावर काही ठिकाणी जाळी बसविण्‍यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT