BMC Saam Tv
मुंबई/पुणे

BMC : आयुक्तांच्या बंगल्यावरील कर थकबाकी आरोपावर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

साम टिव्ही

आवेश तांदळे, मुंबई

BMC Latest News :

मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्याची मागील १४ वर्षांपासून कर थकबाकी ही ४.५६ लाख असल्याचे समोर आलं. त्यानंतर विरोधकांकडून मुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली. यानंतर मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या बंगल्याची अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याची सुमारे ४ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे आरोप प्रसारमाध्यमांवर करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही पालिकेवर भरपूर टीका आहे. मात्र सदर आरोप वस्तुस्थितीशी विसंगत आहे. याबाबत जनतेत गैरसमज पसरू नयेत, असं स्पपष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा मालमत्ता कर रकमेचे देयक दिनांक ५ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आलं होतं. मालमत्ता कराचे देयक प्रसारित झाल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते.

यानुसार सदर देयक भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक ५ जून २०२४ ही आहे. तसेच कर देयक ४ लाख ५६ हजार इतका भरणा आहे. याबाबत कार्यवाही महानगर पालिकेने सुरु केली आहे. आयुक्तांच्या बंगल्याचा कर येत्या दोन ते तीन दिवसांत जमा होईल. याबाबत जनमानसात गैरसमज पसरू नये, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर पाणी सुविधांसाठी केलेला खर्चाबाबत मागील 5 वर्षांची माहिती दिली. प्रत्येक महिन्यानुसार एकूण पाणी आकार खर्च याची माहिती मागितली होती.

अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. अनिल गलगली यांस 31 मार्च 2024 पर्यंतची माहिती दिली. 1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2023 पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. त्याचबरोबर 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतकं आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा देखील समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT