Eknath shinde Vs uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: दसरा मेळाव्यासाठी BKC मैदान शिंदे गटाला; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

शिवाजी पार्कमध्ये यंदाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये चढाओढ सुरू आहे.

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) यंदाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये चढाओढ सुरू आहे. मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

अशातच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए' चे मैदान मिळावे यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी अर्ज केला होता. तो ‘MMRDA’ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिंदे गटाने शिवसेनेवर (Shivsena) केलेला दावा आणि त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरुच आहे. अशातच शिंदे गटाने शिवसेनेच्या नावासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे.

शिवाय ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी शिंदे गट एकही संधी सोडत नसल्याचं दिसतं आहे. यासाठी शिंदे गटाने प्रतिशिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहेच. तर शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंपासून (Balasaheb Thackeray) ओळख असलेला दसरा मेळावा देखील आता आपणच घेणार असल्याचं शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

शिवाय ज्या शिवाजी पार्क मैदानावर हा दसरा मेळावा व्हायचा ते मैदान देखील आपणाला मिळावे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट एकाच मैदानासाठी आग्रही आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए'चे मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज आता एमएमआरडीएने स्वीकारल्याने शिंदे गटाला मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिवसेनेने मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र ते आधीच आरक्षित असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कची परवानगी दोन्ही गटांना नाकारली तरी BKC मधील एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्याचा पर्याय शिंदे गटासाठी उपलब्ध असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT