Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

'कंस, रावणाची आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही, तिथे तुम क्या चिज हो शरदबाबू ?'

'देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देता विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं यातूनच आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला हे शरद पवारांना चांगलंच समजलं आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नारपूरात भाजपची एकहाती सत्ता राज्यात आणणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवरांनी उत्तर दिलं होतं. 'भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्तेत येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावरुनच भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंनी टीका केली आहे.

ते म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देता विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं यातूनच आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला हे शरद पवारांना चांगलंच समजलं आहे आणि म्हणूनच आपण केलेल्या चुकी पोटी आज देवेंद्रजी सातत्याने ठाकरे सरकारचे पुराव्यानिशी वस्त्रहरण करत आहेत त्यामुळे पुरत्या घाबरलेल्या खासदार शरद पवारांनी स्वतःला आणि नवख्या आमदारांना धीर देताना असं वक्तव्य केलं आहे की ‘घाबरू नका मी भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देत नाही !’ पण असं आहे कि कंसाची आणि रावणाची जिथे अशी आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही तिथे तुम क्या चिज हो शरद बाबू ? बुरा ना मानो होली है ! असं म्हणत तुषार भोसलेंनी पवारांवरती टीका केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT