BJP
BJP Saam TV
मुंबई/पुणे

भाजपचे मिशन 2024 सुरु! एकट्याने निवडणुका लढविण्यासाठी भाजप सज्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक (BJP Core Committee Meeting) आयोजित केली होती या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) भाजपा सरचिटणीस विनोद तावडे, आमदार संजय कुटे, आमदार रविंद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते या बैठकीत भाजपने २०२४ च्या निवडणुकांसाठीची रणनीती आखली आहे.

एकंदरीत भाजपच मिशन २०२४ सुरू झालं असून यासाठी भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन लोकसभा आणि त्यामध्ये येणार्या सर्व विधानसभा निवडणूकांची जबाबदारी देण्यात आळी असून २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघ एकट्यान लढवण्यासाठी भाजपने तयारीला सुरूवात केली आहे.

मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप (BJP) लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा कोअर कमिटी बैठकीत निर्णय घेतल्याप्रमाणे खालील नेते करणार संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधनी करणार आहेत. या दौऱ्याचं समन्वय भाजपा संघटनमंत्री श्रीकांत भारती (Srikant Bharti) करणार आहेत.

खालील नेते करणार संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधनी -

१.देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर

२.चंद्रकांत दादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३.सुधीर मुंनगंटीवार - बीड, जालना

४.पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

५.आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग

६. श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती

८. प्रविण दरेकर - पालघर मिरा भाईंदर

९. गिरीष महाजन - उस्मानाबाद, हिंगोली

१०. संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११.रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण

१२. रावसाहेब दानवे - बुलढाणा नंदूरबार

१३. संभाजी पाटील निलंगेकर - गोंदिया, भंडारा

१४. सुधीर मुंनगंटीवार - जालना आणि बीड

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

SCROLL FOR NEXT