BJP
BJP Saam TV
मुंबई/पुणे

BJP: सोमय्या ग्राउंडवर होणार भाजपची बूस्टर डोस सभा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : भारतीय जनता पक्षाची 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मोठी सभा आयोजित करण्यात आली असल्याचं भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठरवला असून कोरोना नंतर भाजपने एवढा मोठा सोहळा करायचा योजला आहे. हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर येणार असून 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बूस्टर डोस सभा होणार असल्याची माहीती यावेळी शेलार यांनी दिली.

या सभे दिवशी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार आहे. पोलखोलमधून आम्ही ज्यांची लक्तरे घेतो आहोत त्यांचा आढावा यावेळी घेणार असल्याचंही शेलार म्हणाले. तसंच कुणी 14 मे ला सभा घेणार आहेत कुणी 1 मे ला सभा घेत आहेत या सर्वांना कडकडित डोस दिला जाईल असही ते यावेळी म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यापासून राज्यातील प्रत्येक पक्षाने आपआपल्या पक्ष वाढीवर लक्ष केंद्रीत केलं असून शिवसेनेच्या शिवसंपर्कक अभियानापासून ते नुकताच पार पडलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) परिवार संवाद यात्रा असो सर्व पक्ष कामाला लागले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घ्यायला सुरुवात केल्यापासून आता, महाविकास आघाडीने पुण्यात सभा आयोजित केली आहे तर भाजपची 1 मे ला सभा पार पडणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT