EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

EPFO Rules for EPF Subscriber: नियम लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिटशी संबंधित पीएफ खात्यातून तुम्हाला तब्बल ५०,००० रुपयांचा फायदा होऊ शकतो. याच बेनिफीटविशयी आज सविस्तर जाणून घेऊ.
EPFO Rules
EPFO RulesSaam TV
Published On

पीएफ खात्यातील सर्व पैसे आपले असतात आणि आपला त्यांच्यावर हक्क असतो. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे पैसे काढू शकता. जेव्हडे आहेत तेव्हडे सर्व पैसे ट्रांसफर देखील करू शकता. EPFO खात्याचे बरेच फायदे आहेत. सेवानिवत्तीच्यावेळी तु्म्ही सतत पैसे न काढल्यास तुम्हाला व्याजासह मोठी रक्कम परत मिळते.

EPFO Rules
कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! PF व्याजदरात वाढ!

पीएफ खात्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. मात्र त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याबाबत अनेकांना माहिती नाही. नियम लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिटशी संबंधित पीएफ खात्यातून तुम्हाला तब्बल ५०,००० रुपयांचा फायदा होऊ शकतो. याच बेनिफीटविशयी आज सविस्तर जाणून घेऊ.

केव्हा मिळतात ५०,००० रुपये

प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचाऱ्याचे पीएफ खाते असते. पीएफ अकाउंट होल्डरने दुसरी कंपनी बदलली तरी त्याला आधीचेच एकच अकाउंट सुरू ठेवावे असे सांगितले जाते. तब्बल २० वर्षे अशा पद्धतीने पैसे भरल्यानंतर Loyalty-cum-Life बेनिफिट चा फायदा तुम्हालाही होऊ शकतो.

जास्तीचा बेनिफिट देणारी ही स्किम फक्त २० वर्षांपर्यंत एकच अकाउंट ठेवणाऱ्या अकाउंट होल्डरसाठी CBDT मार्फत देण्यात आला आहे. केंद्र सरकारने देखील या बेनिफिट्ससाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे २० वर्षे यामध्ये तुमच्या पीएफचे पैसे कट होत असतील तर तुम्हालाही या बेनिफिटचा फायदा होईल.

सॅलरीनुसार येणारी आकडेवारी

Loyalty-cum-Life बेनिफिटमध्ये ५००० रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी असलेल्या व्यक्तींना ३०,००० रुपयांचा फायदा होतो. ५,००१ ते १०,००० रुपये बेसिक पगार असलेल्या व्यक्तींना ४०,००० रुपयांपर्यंत फायदा होतो. तर १०,००० हजारांहून जास्त बेसीक सॅलरी असलेल्या व्यक्तींना ५०,००० रुपयांपर्यंत फायदा होणार आहे.

या बेनिफिटचा फायदा तुम्हाला कसा होईल?

१. EPFO च्या प्रत्येक सबस्क्रइबर व्यक्तींनी आपली नोकरी बदलली तरी एकच पीएफ खाते ठेवावे.

२. यासाठी तुम्हाला तुमची सध्याची कंपनी आणि आधीची कंपनी दोघांनाही पीएफ खात्याची माहिती द्यायची असते.

३. शक्यतो नोकरीवर असताना पीएफ खात्यातून पैसे काढू नका.

४. यामुळे संबंधित व्यक्तीला इनकटॅक्स तसेच रिटायरमेंटच्यावेळी अडचणी येऊ शकतात.

५. नोकरी करतानाच पैसे काढल्यास तुम्हाला पेन्शन बेनिफिट्सही मिळत नाही.

EPFO Rules
EPF Money Claim: कंपनी बदलली, अन् PF खात्यात अडकले पैसे, घरबसल्या असे मिळवा परत; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com