Mahavikas aghadi and bjp  Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी रखडली; केंद्रीय निवडणूक आयोगाने मागितली 'ही' माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र, आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे जोवर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची मतदान (Voting) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीला पाच वाजता सुरुवात होणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र, आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे जोवर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही. (Rajya Sabha Election voting News)

आज मतदानावेळी भाजपचे (BJP) पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्याची मागणी केली . भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे.त्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून जितेंद्र आव्हाड ,यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मते करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावरही आक्षेप घेतला आहे.

या सर्व आक्षेपानंतर काही आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण मागवले आहेत. चित्रीकरणाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतमोजणीला परवानगी देणार आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) देखील केंद्रीय निवडणूक आयोग पत्र पाठवणार आहेत. काँग्रेसचे (Congress) शिष्टमंडळ देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीत भेटण्यासाठी गेले आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं स्पष्टिकरण योग्य आहे की नाही यावर विचार करून निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. केंद्रातील या बैठकीमुळे मतमोजणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागले

नवीन ड्रायव्हरने घाट मार्गावर वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी?

Signs of liver disease on hands: लिव्हर खराब होत असताना हळूहळू हातांवर दिसून येतात 'ही' लक्षणं; वेळीच बदल ओळखून उपचार घ्या!

Maharashtra Live News Update : गुरुपौर्णिमेला साई चरणी 65 लाख रुपये किमतीचे सोने चांदी, हिऱ्यांचे दान

Peanut Butter Recipe: टेस्टी पीनट बटर खायला आवडतं? मग घरीच बनवा शुगर-फ्री पीनट बटर

SCROLL FOR NEXT