Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Salon News: पुण्यातील सलून चालकाला भाजपा कार्यकर्त्यांचा चोप, पाहा व्हिडीओ

BJP Worker Attack: पुण्यातील कोथरूडमध्ये एका सलूनमध्ये गोंधळाची घटना घडली असून भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सलून चालकाला मारहाण केल्याचा आरोप पुढे आला आहे.

Dhanshri Shintre

पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका सलूनमध्ये वादग्रस्त प्रकार घडला आहे. या घटनेत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एका सलून चालकाला मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. आरोप आहे की, संबंधित सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचे सलून चालकाकडून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत होता.

या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या उज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सलूनमध्ये धडक दिली आणि सलून चालकाला बेदम चोप दिला. मात्र, पोलिसांनी दिलेलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे धार्मिक वाद नसून आर्थिक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, संबंधित तरुणीने सलूनमध्ये काम सुरू करताना अँडव्हान्स स्वरूपात काही पैसे घेतले होते. नंतर तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

मात्र तिने घेतलेले पैसे परत न करता थेट निघून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे सलून चालकाने तिच्यावर राग काढत तिला शिवीगाळ केली. याच घटनेनंतर वाद उफाळून आला आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून सर्व बाजू तपासल्या जात आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात महिलांचा गोंधळ आणि सलून चालकावर करण्यात आलेली मारहाण स्पष्टपणे दिसून येते. पोलिसांनी या प्रकरणी सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, नेमकी कायदेशीर कारवाई काय केली जाईल, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT