पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या १२ जागा Saam Tv
मुंबई/पुणे

पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या १२ जागा

मतदान केलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ९ नगरसेवकांची मतं अवैध ठरली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे - पीएमआरडीएच्या निवडणुकीचे शहर हद्दीतील मतदानाचे निकाल लागले आहेत आणि यामध्ये एक मजेशीर प्रकार पुढे आला आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या नगरसेवकांनाच मतदान करता येत नसल्याचे समोर आले आहे. मतदान केलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ९ नगरसेवकांची मतं अवैध ठरली आहेत. या निवडणूकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळून एकूण २८५ नगरसेवकांचे मतदान होते. यापैकी २७८ नगरसेवकांनी मतदान केलं. पण त्यातील ९ नगरसेवकांनी मतदान करताना चूक केली आहे.

हे देखील पहा -

महापालिका हद्दीतून भाजपचे १२, राष्ट्रवादीचे ७ तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. यामध्ये काँग्रेसने केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनंतर काँग्रेसचे ३ मतदार फोडल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दरम्यान या निकालांवरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने जोरदार जल्लोष करत आगामी निवडणुकांसाठी सूचक निकाल असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. इतकंच नाही तर भाजपच्या शहराध्यक्षांना झोप लागणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मुंगेरीलाल के हसीन सपने भंग पावल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT