BJP will contest elections alone in Maharashtra, NCP MLA Jitendra Awhad Tweet Ajit Pawar Eknath Shinde Maharashtra Politics Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार? बड्या नेत्याच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics News: राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असा निर्णय भाजप संघाच्या बैठकीत झाला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Satish Daud

Maharashtra Politics Latest News

राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असा निर्णय भाजप संघाच्या बैठकीत झाला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी यासंदर्भात X अकाउंटवरून पोस्ट देखील केली आहे. सोबतच त्यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा देखील साधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उटल सूलट चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सध्या अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटाचं महायुती सरकार सत्तेत आहे. आगामी निवडणुकीत (Maharashtra Politics) आम्ही एकत्र निवडणूक लढवणार, असा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी X अकाउंटवर पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली", असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"बैठकीत तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले, या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले", असा दावाही आव्हाड यांनी X पोस्टमधून केला आहे.

"ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी.महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही", असं म्हणत आव्हाड यांनी शिंदे गटासह अजित पवार गटाला टोला हाणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT