BJP Diwali 2022 Saam TV
मुंबई/पुणे

BJP Diwali 2022: भाजपकडून मराठमोळा दिपोत्सव साजरा होणार; BMC निवडणुकीसाठी भाजपचं मराठी कार्ड...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व हिंदू सण हे उत्साहात साजरे केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार शिंदे गट आणि भाजपकडून (BJP) सर्व हिंदू सण उत्साहात साजरे करत आहेत. अशात भाजपने आपली वेगळी रणनीती आखली आहे. यंदा होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मराठी जणांमध्ये आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार भाजप सर्व मराठी सण उत्साहात साजरा करत आहेत. गणेशोत्सव, दही हंडी, मराठी दांडिया यानंतर आता भाजप मराठी दिवाळी साजरा करणार आहे. (BJP Marathi Diwali News)

भाजपकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात यंदाची दिवाळी (Diwali 2022) मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात, ढंगात साजरी करायची आहे असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच आपली खाद्य संस्कृती, आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे असं आवाहन या व्हिडिओतून करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सर्व मुंबईकरांना दि. १९ ॲाक्टोबर ते २३ ॲाक्टोबरला जांबोरी मैदान, वरळी याठिकाणी सहकुटुंब दिवाळीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. #आपलामराठमोळादिपोत्सव या हॅशटॅगखाली भाजप आपली मराठमोळी दिपावली साजरी करणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी (BMC Eelction 2022) जनतेची साथ मिळवण्यासाठी भाजप यंदा चांगलाच जोर लावत आहे. भाजप यंदा सर्व सण-उत्सव जोरदारपणे साजरा करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपला आता मुंबई महापालिकेतही सत्तेत यायचं आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दहिहंडीप्रमाणे, गणेशोत्सव, मराठी दांडिया आणि आता मराठी दिपावली जोरदार साजरा करुन भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. यावरुन भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी खूपच गंभीरपणे काम करत असल्याचं चित्र आहे. राज्याची सत्ता हातात घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही (BMC) सत्ता मिळवण्यासाठी भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे यंदाची बीएमसी निवडणुक ही शिवसेनेसाठी तारेवरची कसरत करणारी ठरेल. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने भाजपची ताकद वाढली असून मुंबईत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कसून प्रयत्न करत आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत, शिवसेना ९३ जागा, भाजप ८२ जागा, काँग्रेस ३१ जागा, रा.काँग्रेस ९ जागा, मनसे १ जागा, सपा ६ जागा, एमआयएम २ जागा आणि अपक्ष ६ जागा असं समीकरण होतं. भाजपने मागच्या निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला चांगलाच धक्का दिला होता. महापौर शिवसेनेचा झाला असला तरी भाजपने शिवसेनेला आपली महात्वाकांक्षा दाखून दिली. त्यामुळे यंदा आपली सत्ता टिकवण्यासाचं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT