Mumbai: Congress workers detained after heated protest outside Amit Satam’s office. saamtv
मुंबई/पुणे

BJP vs Congress: भाजप नेत्याचं वक्तव्य खुपलं, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; हातापायाला धरून पोलीस व्हॅनमध्ये भरले

BJP vs Congress Clash: अमित साटम यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यानंतर मुंबईत राजकीय तणाव वाढला आहे. भाजप आणि काँग्रेस समर्थक आमनेसामने आल्यानंतर पोलिसांनी अनेक निदर्शकांना ताब्यात घेतलंय.

Bharat Jadhav

भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी साटम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. काँग्रेस आमदार असलम शेख यांच्यावर केलेल्या अभद्र भाषेतील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली होती. साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस साटम यांच्या अंधेरी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली.

काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यानं पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यावेळी साटम यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाले होते. दरम्यान पोलिसांनी संतप्त आंदोलकांना ताब्यात घेतलंय.

अमित साटम काय म्हणाले होते?

"अस्लम शेख यांना अमित साटम यांनी पाकिस्तानच्या औलादी म्हटलं होतं. पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबाद भीक घालत नाही. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवला आहे, तो उखाडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असं अमित साटम म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं.

काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर धडकले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले तेव्हा पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी इथे आधीपासूनच बॅरिकेटिंग लावली होती. पण तरीही काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी आल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेदेखील तेथे आले. . यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वाद होताना दिसला त्यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT