Pune Politics Saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीचे फटाके, शहराध्यक्षांच्या पोस्टने चर्चांना उधाण, VIDEO

Pune Political News : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीचे फटाके उडाल्याचे दिसत आहे. पुण्यातील भाजप शहाराध्यक्षांच्या पोस्टने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

पुणे : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीनाट्य सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातही भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हेमंत रासने यांच्या उमेदवारीवरून पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज झाले आहेत. धीरज घाटे यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यातून भाजपने तीनही जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण तीस वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नको, अशी धीरज घाटे यांनी फेसबुक पोस्ट नाराजी व्यक्त केली आहे. धीरज घाटे कसबा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते.

भाजपकडून पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील सहा मतदारसंघात भाजपने उमेदवार घोषित केले आहे. कसबा मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना संधी मिळाली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात केलेली विकासकामे आणि संघटना बांधणीमुळे रासनेंच्या नावाला पसंती होती. भाजपच्या सर्व सर्व्हेत हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिलं. त्यानंतर अखेर भाजपने उमेदवारीची मोहोर लावली. शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक कसब्यातून इच्छुक होते. परंतु भाजपने रासने यांच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

पुण्यात नवीन चेहऱ्यांना संधी नाही

पुण्यातील सर्व विद्यमान आमदारांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केले आहेत. पुण्यातील एकाही नवीन चेहऱ्याला भाजपकडून संधी मिळाली नाही. सर्वात आधी या संदर्भात 'साम'ने विश्वसनीय सूत्रांच्या आधारे याबाबत बातमी दिली होती. भाजपकडून एलेक्टिव्ह मेरिट, पक्ष आणि संघाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुण्यातील सर्व उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

खडकवासला: भीमराव तापकीर

कॅन्टोन्मेंट: सुनील कांबळे

शिवाजीनगर: सिद्धार्थ शिरोळे

कोथरूड: चंद्रकांत पाटील

पर्वती: माधुरी मिसाळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress third list : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा

Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

MS Dhoni: आयपीएल विश्वातील सर्वात मोठी घडामोड; एमएस धोनी CSK मधून खेळणार?, पडद्यामागं काय घडलं?

Nawab Malik : अजित पवारांची मनधरणी अपयशी; नवाब मलिक निवडणूक लढण्यास ठाम, कुठून भरणार अर्ज? VIDEO

Love Rashifal: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे ५ राशींच्या लव्ह लाईफमध्ये येणार आनंदी आनंद

SCROLL FOR NEXT