सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी भाजपचं आक्रमक आंदोलन saam tv
मुंबई/पुणे

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी भाजपचं आक्रमक आंदोलन

ठाकरे सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी यासाठी आज भाजपच्या वतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात आले, भाजपचे नेते प्रविण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन करण्यात आले, आमदार अतुल भातखळकर आमदार राहुल नार्वेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते, मुंबईतल्या विविध स्टेशनवर आज भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सध्या बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे मग रेल्वेतून प्रवासाची मुभा का नाही असा सवाल उपस्थित करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर राज्य सरकारवर टीका केली. प्रवीण दरेकरांसोबत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर टीसीकडून कारवाई करण्यात आली तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले, दरम्यान अतुल भातखळकर शेकडो कार्यकर्त्यांसह कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेर जमले होते. यावेळी जोरदार जमावाने आक्रमक पवित्र घेतल्याने पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे भातखळकर यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलिसांनी भातखळकरांसह काही जणांना ताब्यात घेतलं. घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याचे समजातच कार्यकर्ते स्टेशनवर जाऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने आता कुठलाही विलंब न करता लोकल सुरु करावी, लसींचे दोन्ही डॉस झालेल्या प्रवाशांना लोकलप्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असून राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Edited by: Ashwini jadhav kedari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT