Uddhav Thackeray Slams J P Nadda Saam TV
मुंबई/पुणे

J P Nadda On Thackeray Government: ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गंभीर आरोप

J P Nadda News: भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीत भ्रष्टाचार होता, असा आरोप जे. पी. नड्डा यांनी केला आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

J P Nadda News: भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जे. पी. नड्डा यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीत भ्रष्टाचार होता, असा आरोप जे. पी. नड्डा यांनी केलाआहे. (Latest Marathi News)

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, 'महाविकास आघाडीत भ्रष्टाचार होता. विकासांची कामे होत नव्हती, त्यांचं प्रत्येक कामात आडकाठी आणणे हेच काम होतं. आता डबल इंजिनच्या सरकारमध्ये तात्काळ होत आहेत. लोकांना न्याय मिळतोय'.

जे पी नड्डा पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींच्या योजनांमुळे अनेकांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. महिलांनी देखील आपले अनुभव सांगितले. सरकारने चांगल्या पद्धतीने योजना राबवल्या की लोकांच्या जीवनात बदल झाले. राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने विकासकामे केली. भारतातील अतिगरीबी आता १ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे'.

'सर्वच समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी या योजनांची योग्य अंमलबजावणी केली. यापूर्वी देखील योजना बनत होत्या, मात्र लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. २५ लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात गेले. इतर कुणी मध्यस्थी केली नाही. पंतप्रधान मोदी एक बटन दाबतात आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जातात, असे नड्डा पुढे म्हणाले.

'राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना या सरकारने राबवली. कोट्यवधी लोकांना याचा लाभ झाला. पंतप्रधान मोदी यांनी १२ कोटी घरात शौचालय, घरात नळ नेले, अशा शब्दात नड्डा यांनी मोदी सरकारच्या कामांचा पाढा वाचला. 'कोरोनामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारखे अनेक देश आर्थिक अडचणीत आले, भारतात तसं चित्र नाही, असेही नड्डा पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT