Lok Sabha Election
Lok Sabha Election  Saam tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election: वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार ठरेना; ४ नावांची जोरदार चर्चा, आज घोषणा होणार?

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : देशातील काही भागात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे महायुतीचा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी भाजपने महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उत्तर मध्य मुंबईचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघातून ४ उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

भाजप महाराष्ट्र प्रभारी उत्तर मध्य मुंबईचा आढावा घेणार आहे. महाविकास आघाडीने लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे जिल्हा कोअर आणि निवडणूक संचलन समितीची बैठक घेणार आहेत. मुंबईच्या सांताक्रूझ येथील बिल्लावा भवनमध्ये सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.

दिनेश शर्मा हे सकाळी ११ वाजता भाजप जिल्हा सुपर वॉरिअर संमेलनात संवाद साधणार आहेत. या मॅरेथॉन बैठकीनंतर दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष हा उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन की आशिष शेलार यांना रिंगणात उतरवणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर या लोकसभा मतदारसंघातून पराग अळवणी आणि उज्ज्वल निकम यांच्या नावाचीही चर्चा आहे.

आज घोषणा होणार का?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने आज आढावा बैठक आयोजित केली आहे. भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे . उत्तर मध्यचा महायुतीचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा होणार आहे. पूनम महाजन आणि उज्जवल निकम यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. आज उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT