Murlidhar Mohol challenges Ajit Pawar’s stronghold in Pune — BJP vs NCP political showdown expected soon. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Murlidhar Mohol Vs Ajit Pawar: अजितदादांच्या साम्राज्याला आता भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान दिलयं. एका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत असणाऱ्या दोन पक्षाची ही लढत नेमकी कोणत्या निवडणुकीसाठी होणार आहे? राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलं.

  • महायुतीतील दोन पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता.

  • पुण्यातील आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध मोहोळ अशी लढत रंगू शकते.

राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील आखाड्यात आता महाकुस्ती रंगणार आहे...गेली 12 वर्ष महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर अजितदादांचं वर्चस्व आहे.. याचं वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं मैदानात उतरवलयं. कुस्तीगीर संघाच्या बळावर मोहोळ यांनी थेट अजित पवारांविरोधात शड्डू ठोकलाय.

2013 पासून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर अजित पवारांचा दबदबा आहे. खो-खो आणि कबड्डी संघटनांवर त्यांचे नियंत्रण आहे. 2013, 2017, 2021 या तिन्ही निवडणुका अजित पवारांनी एकतर्फी जिंकल्यात. यावेळीही कबड्डी संघटनेतून अजित पवारांनी चौथ्या टर्मसाठी अर्ज दाखल केलाय..तर दुसरीकडे कुस्ती महासंघाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत उतरलेत. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनशी जोडल्या गेलेल्या 30 संघटनांमधून प्रत्येक 2 असे 60 जण या निवडणुकीत मतदान करतील.

दरम्यान महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर खेळाडू अध्यक्ष असावा यासाठीच मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरल्याचं कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणालेत. दुसरीकडे ऑलिंपिक निवडणुकीसाठी कोणीही फॉर्म भरू शकत, असं म्हणत अजित पवारांनीही मोहोळ यांच्याविरोधात दंड थोपटलेत.

राज्यात आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे... त्यातच महायुती सरकारमधीलच दोन उमेदवार ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आमनेसामने आल्यानं 2 नोव्हेंबरला होणारी ही निवडणूक फक्त क्रीडा क्षेत्राची आहे की महायुतीतल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या राजकीय 'पॉवर गेम'ची? अशी चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

SCROLL FOR NEXT