narayan rane health update  Saam tv
मुंबई/पुणे

नारायण राणे यांची तब्येत बिघडली; मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल

narayan rane health update : खासदार नारायण राणे यांची तब्येत बिघडली. त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Vishal Gangurde

भाजप खासदार नारायण राणे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल केलंय

हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय

नारायण राणेंची प्रकृती स्थिर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलंंय. हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राणेंवर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

नारायण राणे यांच्यावर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर यशस्वीपणे शस्रक्रिया झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राणे फारसे राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही मुलांनी आक्रमकरित्या निवडणूक लढवली. शस्त्रक्रियेनंतर आज नारायण राणे पुन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या राणेंची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळत आहे.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी कोकणातील दौऱ्यावर राजकीय निवृत्तीविषयी सूचक विधान केलं होतं. स्थानिक नगरपंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवलं होतं. त्यावेळी कणकवलीत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्काराच्या कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले होते. "आता बास झालं, किती करणार? अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे म्हणाले होते, 'आपण थकलो आहोत. कामाला आणि वर्याला मर्यादा असतात. दोन्ही मुले कर्तृत्वान आहेत. ते त्यांच्या क्षेत्रात राजकीय यशस्वीरित्या काम करताहेत, असे सांगून दोघांना आशीर्वाद दिला होता. राणेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्यानंतर निवृत्तीची देखील चर्चा सुरू झाली होती. आज पु्न्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शरद पवारही रुग्णालयात दाखल

खासदार शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केले आहे. खोकल्याचा त्रास झाल्याने पवारांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक मायदेशी परतणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था

HBD Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती किती? एका चित्रपटाने अभिनेत्री झाली रातोरात स्टार

Back Massage: घरच्या घरी पाठीचा मसाज कसा करायचा? वाचा सोपी पद्धत

Virosh Scholarship: लग्नानंतर रश्मिका-विजयचा मोठी घोषणा; ४४ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर

Dharashiv : भल्या पहाटे कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा, ६ जण घरात घुसले अन्....

SCROLL FOR NEXT