Ghatkopar Hoarding Collapsed Case:  Saam Tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Hording Case: होर्डिंग दुर्घटना प्रकरणात ठाकरेंचा हात, मातोश्रीपर्यंत पोहोचले धागेदोरे? भाजप आमदारांची चौकशीची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज मसुरकर, साम प्रतिनिधी

आज विधानसभेत घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी लक्षवेधी मांडली गेली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील सर्व होर्डिंगचं स्ट्रकचरल आँडिट करावं, अशी मागणी सभागृहात केली. यावर सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. तीस दिवसांत सर्व होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. हाच मुद्दा धरून भाजपा आमदार राम कदम यांनी होल्डिंगच्या प्रकरणावरती सर्वांचे लक्ष वेधलं याचं कारणही तसंच आहे कारण भाजप आमदार राम कदम यांनी थेट होर्डिंग दुर्घटना प्रकरण हे थेट मातोश्री जोडलं.

राम कदम यांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरे यांच्या चौकशीची मागणी केलीय. सभागृहात केली यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये एकच गदारोळ पाहायला मिळाला. भाजप आमदार राम कदम यांनी ज्या मातोश्रीत मंत्री लोकांना कोविडच्या काळात बंदी होती, त्याच मातोश्रीत आरोपी भिंडेला रेडकार्पेट टाकले गेले असा आरोप कदम यांनी केला. एवढचं नव्हेतर तर राजाश्रय असल्याशिवाय परवानगी मिळू शकत नाही, त्याच्या मागे कोण होत? कोविड काळात कशी परवानगी दिली गेली असे सर्व प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केले. एवढचं नव्हे तर कोविडकाळातील आरोपी भिंडेचा मातोश्रीवरचा फोटो दाखवत हा फोटो नाकारू शकत नाही अस ही ते म्हणाले. आणि चॊकशीची मागणी देखील केली.

तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोपी भिंडेला मातोश्रीवर नेणारा आमदार दुसरा तिसरा कोणी नसून हे आमदार सुनिल राउत आहेत अस थेट नाव घेत, तसेच आरोपी भिंडेचा सीडीआर तपासावा अशी मागणी करत, सुनिल राऊतांवर आरोप केला आणि यावरून एकच गदारोळ सभागृहात झाला. मात्र आमदार सुनिल राऊत यांनी नितेश राणेंचे आरोप फेटाळत जर आरोपी भिंडेशी काही संबध निघाला तर मी राजीनामा देईल नाहीतर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजीनामा द्यावा अस प्रति आव्हान आमदार सुनिल राउत यांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : PM मोदींच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकांनी 'या' आरोग्याच्या चाचण्या केल्याच पाहिजेत; वेळीच जाणून घ्या

Viral Video: क्षणभर विश्रांती घेत जवानांनी नेपाळी गाण्यावर धरला ठेका, धमाकेदार डान्सचा VIDEO व्हायरल

Relationship Tips : EX च्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं चांगलं की वाईट; वाचा फायदे आणि नुकसान

Pune News: स्कूल बसमध्ये चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण, वंचितच्या ९ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT