Prasad Lad Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राऊत फक्त शरद पवार यांची चमचेगिरी करतात; प्रसाद लाड यांची टीका

आप चा बाप कोण हे मला विचारायचे आहे. आप हा डमी आहे कारवाई शिवसेना करत आहे असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई :काल बुधवारी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या विरोधात 'आप'ने (AAP) आंदोलन केले. या आंदोलनावर आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रीया दिली. 'काल आपच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आंदोलन केले. आप चा बाप कोण हे मला विचारायचे आहे. आप (AAP) हा डमी आहे कारवाई शिवसेना (Shivsena) करत आहे असा आरोप भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला.

जी व्यक्ती भ्रस्ताचार करते ती संस्था मोठी करू शकत नाही. मुंबईत जेव्हा गिरणी कामगारांना घरे दिली तेव्हा कर्ज मुंबई बँकेने दिले होते. शिक्षकांचे पगार होत नव्हते तेव्हा मुंबई जिल्हा बँकेने मदत केली होती. जे मदत करतात त्यांना मजुर म्हणून हीनवू नका असेही प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले.

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना आरोपी करणे निषेधार्थ आहे. मजूर प्रवर्गातून दोन संचालक जातात. दरेकर यांच्यावर कारवाई करत आहात तर प्रत्येक जिल्ह्यातील मजूर संस्थेतील लोकांवर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करणार यात 90 टक्के लोक काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची (NCP) असेही लाड म्हाणाले.

यावेळी प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ईडीने (Ed) कारवाई केलेल्या सतिश उके यांच्यावरही प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. कारावाई झाली की संजय राऊत 9 वाजाता आरवायला सुरू करतात. जोपर्यत गुन्हा दाखल होत नाही तोवर ईडी कारवाई करत नाही. सतीश उके यांच्या बाबतीत जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पवार साहेबांची चमचेगिरी करण्याशिवाय दुसरे काही काम नाही असी टीका लाड यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

हे सरकार भाजपच्या (BJP) नेत्यांवर सतत आरोप करत आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून चौकशी होतं आहे. पण आमच्या बाबत कुठेही सॉफ्ट कॉनर राष्ट्रवादीचा नाही अस स्पष्टीकरण लाड यांनी केलं. काँग्रेसच्या (Congress)नादाला लागून विशिष्ट समाजाला खुश करण्याचे काम शिवसेना करत आहे. सामानातून फक्त चमचेगिरी सुरू आहे अशी टीकाही प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

SCROLL FOR NEXT