BMC Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : कोरोनाकाळात बीएसमी अधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार? भाजप आमदाराच्या आरोपाने खळबळ

कोरोनाकाळात मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदाराने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Mihir Kotecha News : कोरोनाकाळात मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदाराने केला आहे. भाजप आमदाराच्या आरोपाने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार मिहीर कोटेजा यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

भाजप (BJP) आमदार मिहीर कोटेजा यांनी पत्रात लिहिले आहे की, 'कोरोना महामारीत सामान्यांचे जीव वाचवेत म्हणून अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा पुरवली. आपणसुद्धा फ्रंटलाईन योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतात, मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई मनपा भ्रष्टाचाराच्या दलदलीतच बरबटत होती'.

आमदार कोटेजा यांनी पुढे लिहिली आहे की, 'तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि मनपा प्रशासनाने २४ वॉर्डमधील अधिकाऱ्यांना फाईव्ह स्टार सर्विस मिळावी यासाठी ३४ कोटी ६१ लाख ५२५ रुपयांचा शासकीय खर्च मंजूर केला. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे'.

'आर्थिक चणचणीत मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथीत 'सोयीसाठी' फाईव्ह स्टार सेवा दिली जात होती. आपण या सर्व प्रकारची चौकशी ॲंटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करावी. ही विनंती आपणास करतो आहे. मृत निष्पाप मुंबईकरांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. शिंदे-फडणवीस सरकार हे न्यायाचं सरकार आहे हा संदेश आपण द्यावा, अशी विनंती आमदार कोटेजा यांनी केली आहे.

कोटेजा यांच्या आरोपानंतर मुंबई मनपा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजप आमदारांच्या आरोपानंतर मनपा अधिकाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतील, हे पाहावे लागणार आहे.

असा होता प्रस्ताव आणि प्रती खोलीचे दर

प्रत्येक हॉटेलमधील खोलीत दोन कर्मचारी राहतील

फाईव्ह स्टार हॉटेल प्रती खोली - दोन हजारअधिक कर

फोर स्टार हॉटेल - १,५०० - अधिक कर

थ्री स्टार हॉटेल - एक हजार रुपये - अधिक कर

नॉन स्टार हॉटेल - ५०९ रुपये अधिक कर

एकूण झालेला खर्च - ३४ कोटी ६१ लाख १२ हजार ५३५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT