संजय राऊत 'या' विकृतीला बांध घाला अन्यथा; पडळकरांचा राऊतांना इशारा! SaamTV
मुंबई/पुणे

संजय राऊत 'या' विकृतीला बांध घाला अन्यथा; पडळकरांचा राऊतांना इशारा!

मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…?

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : "माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो' कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील" असा इशारा पडळकरांनी संजय राऊत यांनी दिला आहे. BJP MLA Gopichand Padalkar criticizes Sanjay Raut

हे देखील पहा-

हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उघड माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो, त्याच्यावरती कारवाई होत नाही कारण अशी कृती करायला सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…? असा सवालही सेनेला आणि मविआ सरकारला विचारला आहे.

तसेच आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत हे असं नाही ना की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे आणि तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल असं म्हणत पडळकरांनी राऊतांना लिहलेल्या सामना मधील अग्रलेखावरतीसुध्दा अनेक टीका केल्या आहेत.

सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर

"ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिकमधून शब्दाने पितळ उघड पाडले मात्र आज तुम्ही त्यांचाच उधोउधो करत आहात हे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? तसेच मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते."

अशा अत्यंत टोकाचे सवाल आणि टीका पडळकरांनी केल्या आहेत आता यावरती सेना काय भूमिका घेतेय याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

SCROLL FOR NEXT