Ashish Shelar
Ashish Shelar Saam Tv
मुंबई/पुणे

Ashish Shelar: दीड महिन्यात 375 किमीची नालेसफाई कशी होणार, शेलार पालिका आयुक्तांच्या भेटीला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे 375 किमीचे नाले अवघ्या दीड महिन्यात कसे साफ होणार? त्यामुळे तातडीने कामांना मंजुरी द्या अशी मागणी करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल यांची भेट घेतली.

मुंबईतील (Mumbai) नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. दरवर्षी ही सुरुवात मार्च महिन्यात होते. त्यानुसार, पालिका प्रशासनाने निविदा काढून 7 मार्चला स्थायी समितीत 160 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला होता. पण, सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली प्रशासक नियुक्ती झाली.

एवढ्या उशिरा सुरुवात करुन कामे कशी पूर्ण होणार, जर कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात (Rain) भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भीती आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाच्या (BJP) स्थापना दिनानिमित्ताने 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून या निमित्ताने मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी आणि देखरेख केली जाणार असल्याचे आशिष शेलार यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

मात्र, अद्याप कंत्राटदारच नियुकती करण्यात आला नाही. त्यामुळे आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली आणि नियमानुसार पारदर्शक पध्दतीने कंत्राटदार नियुक्ती करुन तत्काळ कामांना सुरुवात करावी अशी मागणी केली.

मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार झाले असून 7 मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅंडिंग बाकी होते का? हे असले कारभारी. मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

सत्ताधारी पक्षाने पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार, वेळेत कामे पूर्ण व्हावीत, पूर्ण गाळ काढला जाईल, भ्रष्टाचार होणार नाही. यासाठी आम्ही मुंबईकरांच्या वतीने या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

SCROLL FOR NEXT