BJP Leader On Uddhav Thackeray
BJP Leader On Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

BJP Leader On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी, अमित शहा यांना नामशेष करायचे आहे का? भाजप नेत्याचा हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

ashish Shelar News : महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेत नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर केलेल्या टीकेला आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'उद्धव ठाकरे म्हणाले भाजपला नामशेष करू, यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचे आहे का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आशिष शेलार म्हणाले, '15 मार्च 2019 भारतीय निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या राजकीय पक्षाच्या यादीत 2334 राजकीय पक्ष आहेत. या सर्व पक्षांना लोकशाही पद्धतीने काम करण्याची संधी आहे. राज्यात 145 पक्ष आहेत'.

'काही पक्षाची स्वतःची विचारधारा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, दुसऱ्या पक्षावर जळफळाट करायचा, दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमालावर भाष्य करतात. अरे तुमचे काय आहे? ना विचारधारा 145 पक्षामधील सर्वात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष', अशी टीका शेलार यांनी केली.

'टवाळखोर माणसांनी एक सभा घेतली. त्याला वज्रमूठ नाव दिले. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले भाजपला नामशेष करू. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नामशेष नरेंद्र मोदींना करायचे आहे का? अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनाही नामशेष करायचे आहे का? असा आमचा प्रश्न आहे. आमचे तु्म्हाला प्रतिआव्हान आहे, याचत महाराष्ट्राच्या मातीत एक औरंगजेब आला होता. तो नामशेष करण्याची भाषा करत होता, असेही शेलार पुढे म्हणाले.

'आज कलियुगात औरंग्याची स्वप्न बघणारे उद्धव ठाकरे नामशेष करण्याची भाषा करत आहेत. ज्यांनी राम मंदिर बांधले, सर्जिकल स्ट्राईक केले त्यांना नामशेष करायला निघालात. कोरोनामध्ये सर्वाना मोफत लस देणाऱ्यांना तुम्ही नामशेष करायला निघालात. कोणाबरोबर बसून नामशेष करायला निघालात. त्यांना नामशेष करणे शक्य नाही, असा पलटवार आशिष शेलार यांनी केला.

'तुमचे औरंगजेबी हिरवं. स्वप्न आता समोर दिसत आहे. आम्ही तुमचे आवाहन स्वीकारले आहे. तुमचे धोरण काय ते सांगा, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रवास अधोगतीकडे चाललाय. आता तर ते मुंबईकरांच्या जीवावर उठत आहे, असाही हल्लाबोल शेलार यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT