BJP MLA criticizes Shivsena सुशांत सावंत
मुंबई/पुणे

'रोज मरे त्याला कोण रडे?' हाच मराठी शाळांबाबत शिवसेनेचा दृष्टीकाेन; भाजप आमदाराची टीका

'भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “Foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन शिवसेनेवर हल्लाबोल केला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एक पत्र लिहलं आहे. आमदार साटम (Amit Satam) यांनी आपल्या पत्रात पहिल्यांदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी लिहलं आहे. 'सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे. खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना (BMC ) टाळं ठोकण्यात येत असून 'रोज मरे त्याला कोण रडे?'अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी शाळांकडे पाहत आहेत. याचा थेट परिणाम मराठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील घसरणीतून समोर येत असल्याचं साटम यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

तसंच याबाबतीत मागील वर्षी देखील पत्र (Letter) व्यवहार करुन सरकारचं लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर न प्रतिक्रिया आली न कारवाई झाली नसल्याचं त्यांनी पत्रात लिहलं आहे. शिवाय २०१२ - १३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या. ८१ हजार १२६ विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये शाळा फक्त २७२ उरल्यात आणि ३४,०१४ विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेतायेत.

म्हणजेच गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येत असल्याची आकडेवारी त्यांनी पत्राद्वारे दिली आहे.

तसंच एकीकडे सत्ताधारी सेना (Shivsena) मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरत असल्याची टीका त्यांनी सेनेवर केली आहे. तसंच मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल, जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही. असा टोला देखील सेनेला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT