Bhim Army  सुमित सावंत
मुंबई/पुणे

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, पालिकेने ते तोडावे - भीम आर्मी

कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - नरिमन पॉईंट येथे भाजपचे (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी (Bhim Army) संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा यावेळी कांबळे यांनी दिला आहे.

हे देखील पहा -

मंत्रालयाजवळ भाजपचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर पणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे.

त्यामुळे यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र देखील लिहिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी यावेळी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT