नवी मुंबई लवकरच ‘फ्लेमिंगो सिटी’ नावाने ओळखली जाणार

ऑक्टोबर महिन्यापासून ते अगदी मे महिन्यापर्यंत हे पक्षी येथे आढळून येतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढतच आहे.
Flamingo
FlamingoSaam Tv
Published On

नवी मुंबई - शहरात पर्यटन स्थळं निर्माण व्हाव. शहराची एक नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी महापालिकेने अनेक प्रयत्न केले. यामुळे नवी मुंबई शहराची एक नवी ओळख निर्माण झाली. आता पुन्हा नवी मुंबई एका नव्या नावाने ओळखू लागली आहे.

प्लॅन सिटी, स्मार्ट सिटी तसेच सायबर सिटी अशा अनेक बिरुदावल्यांमुळे ओळखली जाणारी नवी मुंबई लवकरच आता ‘फ्लेमिंगो सिटी’ (Flamingo City) या नावाने देखील ओळखली जाणार आहे. ऐरोली ते बेलापूरच्या (Belapur) खाडी किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे नवी मुंबईला (Navi Mumbai) अनोखी ओळख मिळणार आहे.

हे देखील पहा -

मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात नवी मुंबई पर्यटनाचं केंद्रबिंदु बनू शकेल आणि फ्लेमिंगो सिटी सारखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब. जगाच्या नकाशावर येऊ शकली तर शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक वाढू शकतील यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्न करीत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.

Flamingo
Pune : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात टोळीयुद्धाचा भडका!

सिगल, ऑस्ट्रेलियन डक, फ्लेमिंगो अशा विविध जातींचे परदेशी पक्षी वाशी आणि ऐरोलीच्या खाडी पुलांवर सहज नजरेस पडतात. ऑक्टोबर महिन्यापासून ते अगदी मे महिन्यापर्यंत हे पक्षी येथे आढळून येतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढतच आहे. हे पाहता कांदळवनांमध्ये आणि पाणथळींमध्ये अन्नाच्या शोधात बसलेल्या पक्ष्यांना पाहण्याची एक वेगळीच पर्वणी असते. त्यामुळे या पक्ष्यांची ओळख नवी मुंबई शहराला जागतिक पातळीवर एक वेगळी दिशा देण्यास मदत होणार आहे.

Edited By - Shivnai Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com