Dhananjay Mahadik Saam TV
मुंबई/पुणे

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजप धनंजय महाडिकांचा अर्ज भरण्याची शक्यता

भाजपकडून आज कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सांवत -

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असणाऱ्या राज्यसभांची (RajyaSabha) उमेदवारी कोणाकोणाला दिली जाणार हा होता. मात्र, आज आता राज्यातील सर्वच पक्षाकडून आपआपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

आज काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) तर शिवसेनेकडून याआधीच संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रवादीकडून (NCP) प्रफुल्ल पटेल यांच्या नाव निश्चित करण्यात आलं आहे.

हे देखील पाहा -

या सर्व पक्षांसोबत भाजपचे (BJP) राज्यसभेचे उमेदवार कोण हे देखील आता जाहीर झालं असून भाजपकडून आज कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पियूष गोयल (Anil Bonde and Piyush Goyal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, भाजपकडून उद्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आज भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये धनंजय महाडिक यांचे नाव घोषित झालं नसलं तरीही तिसऱ्या जागी महाडीक यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने उद्या महाडीक यांचा अर्ज भरला तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसंच भाजप या तिसऱ्या जागेची जुळवा जुळव कशी करणार हे देखील पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

SCROLL FOR NEXT