Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये युती होऊ शकत नाही, सुधीर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या भवनामध्ये भेट झाली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपची युती कधीही होऊ शकत नाही, असे मोठं विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या भवनामध्ये भेट झाली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले आहे. विधानभवनामध्ये लिफ्टसाठी देवेंद्र फडणवीस थांबले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे त्याठिकाणी आली. यावेळी दोघेही एकाच लिफ्टने वर जाऊन दोघेही सभागृहात गेले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली होती. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

अशामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, 'याचा राजकारणाशी दूरदूर पर्यंत संबंध नाही आणि असा संबंध भविष्यात येईल का याचे उत्तर नेत्यांच्या चर्चेतून माझ्यापाशी आहे. असे आम्ही परत कधीही एकत्र येऊ शकत नाही. भारतीय जनाता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची युती कधीच होऊ शकत नाही. याबद्दल आमच्या कोअर टीममध्ये एकमत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

SCROLL FOR NEXT