Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

Shreya Maskar

कोकण

कोकण ही महाराष्ट्राची शान आहे. गणपतीला कोकणात उत्सव असतो. कोकणात एक सुंदर मंदिर वसलेले आहे, जे खूप कमी लोकांना माहितेय. येथे नक्की भेट द्या.

Konkan | google

दापोली

रत्नागिरीतील दापोली येथील आंजर्ले गावातील 'कड्यावरचा गणपती' हे कोकणातील एक अद्वितीय मंदिर आहे. या मंदिरात गणपतीची काळ्या पाषाणातील एक दुर्मिळ मूर्ती असून तिची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे.

Dapoli | google

कड्यावरचा गणपती

हे मंदिर एका टेकडीवर वसलेले असून तेथून आंजर्ले समुद्रकिनारा आणि जोग नदीच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते. वन डे ट्रिपसाठी हे सुंदर ठिकाण आहे.

Kadyavarcha Ganpati | google

नावाचा इतिहास

'कड्यावरचा गणपती' हे नाव कड्याच्या (डोंगराच्या कडा किंवा कडाऱ्याच्या) टोकावर वसलेल्या मंदिरांसाठी वापरले जाते. महाराष्ट्रात माथेरान आणि आंजर्ले येथे अशी मंदिरे आढळतात.

History of the name | google

नयनरम्य ट्रेकिंग

हे एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि पर्यटन स्थळ आहे. विशेषतः पावसाळ्यात इथून धुक्याने आच्छादलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते.

Scenic trekking | google

कसं जाल?

'कड्यावरचा गणपती' ला जाण्यासाठी तुम्ही मुंबईहून रत्नागिरीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रत्नागिरी स्टेशनला उतरून रिक्षाने किंवा बसने तुम्ही मंदिरापर्यंत पोहचाल.

how do you go | google

दापोली पर्यटन स्थळे

करडे बीच, लाडघर बीच, मुरुड बीच, केशवराज मंदिर, पन्हाळेकाजी लेणी

Dapoli Tourist Places | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात फिरण्याची हौस असेल तर बेलापूरजवळची 'ही' ५ ठिकाणं मिस करू नका!

Belapur Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...