Prasad Lad Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: नमाज पठण बंद केलं नाही तर त्याच रस्त्यावर...., प्रसाद लाड आक्रमक, पाहा VIDEO

Prasad Lad Aggresive On Namaj Pathan At Road: रस्त्यावरील नमाज पठणाविरोधात प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. रस्त्यावरील नमाज पठण बंद करावं, अशी मागणी त्यांनी केलीय.

Rohini Gudaghe

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. यादरम्यान आता भाजप नेते प्रसाद लाड हे नमाज पठणाविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ज्याप्रकारे धारावीतील ९० फीट रोडवर नमाज पठण (Namaj Pathan) झालं, ते बंद नाही झालं तर शनिवारी त्याच रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल, असा इशाराच लाड यांनी दिलाय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना देखील यासाठी विनंती केल्याचं त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे.

प्रसाद लाड यांचा इशारा

या मातृभूमीवर जो प्रेम करतो, तो हिंदुस्थानी आहे. पण आमच्या मातीला आणि आईला शिव्या देईल. पाकिस्तानचे झेंडे मिरवील, त्यांच्या विरोधात हा हिंदुस्थानी उभा राहील असा इशारा देखील लाड (BJP Leader Prasad Lad) यांनी दिलाय. समाजासाठी आणि धर्मासाठी आम्ही शपथ घेतली आहे. पद आणि सत्ता येतात जातात, पण धर्मापुढे काही नाही. विशिष्ट समाजाकडून हिंदू धर्माला घाबरवलं जातं.सत्तेसाठी आम्ही सहन करत राहिलो, तर मला वाटतं आम्हाला नपुंसक व्हावं लागेल, अशी भीती देखील त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

रस्त्यावर नमाज पठण

मुख्यमंत्र्यांना विनंती केलीय की, अरविंद प्रकरण फास्टट्रॅक करून सहा महिन्यांत आरोपींना फाशी द्यावी. लव जिहादसारख्या गोष्टींवर पोलीस कायमस्वरूपी तोडगा काढतील असा विश्वास देखील प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय. आम्ही औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर नाही, ज्यांनी सत्तेसाठी तडजोड केली. वेळप्रसंगी हिंदुत्वासाठी सत्ता सोडावी लागली तरी आम्ही स्वतः सोडायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदू समाजासाठी (Hanuman Chalisa) भूमिका घेतल्याचं प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलंय.

नार्को टेस्टची मागणी

सचिन वाझे यांच्या नार्को टेस्टची मागणी मीच केली होती, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. लवकरच हिरेन हत्याकांड, अंबानीचं बॉम्ब प्रकरण, शंभर कोटी प्रकरण दिशा सलीयान खून किंवा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या का खून (Maharashtra Politics) आहे? याचा उलगडा नार्को टेस्टमधून होईल. या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख आहेत का? जयंत पाटील आहेत का? किंवा स्वतः उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत का? याचाही खुलासा लवकरच होईल असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT