Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख ही जोडी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
सध्या सोशल मीडियावर जेनेलिया देशमुखचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जेनेलिया ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पर्सनल टू प्रोफेशनल लाईफविषयी चाहत्यांना अपडेट देते.
फॅमिलीसोबतचे फोटो देखील जेनेलिया पोस्ट करते. नुकतेच जेनेलियाने तिचे मराठमोळ्या सौंदर्यातील फोटो पोस्ट केले आहेत.
या लूकमध्ये जेनेलिया निळ्या रंगाच्या खणाच्या साडीमध्ये सुंदर दिसते आहे. तिचं गालावर हास्य उमललं आहे
केसात गजरा, कानात झुमके, हातात बांगड्या, गळ्यात हार असा जेनेलियाचा मनमोहक अंदाज उठून दिसतो आहे.
जेनेलियाच्या फोटोंवर रितेश देशमुखने 'माझ्या हृदयाचा ठोका !!!!' अशी कमेंट केली आहे.