Nitin Gadkari
Nitin Gadkari Saam TV
मुंबई/पुणे

व्हायरल व्हिडिओवर नितीन गडकरी संतापले, दिला कारवाईचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री गडकरी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला फरक पडत नाही, असं म्हणत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडिओवरून नितीन गडकरी चांगलेच संतप्त झाले आहेत, त्यांनी या संदर्भात कारवाईचा इशारा दिला आहे. काही माध्यम संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचं सत्य, असं म्हणत नितीन गडकरींनी एक व्हिडिओ (Video) ट्विट केला आहे.

या व्हिडिओवर आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गडकरी यांचे दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील विधानाची मोडतोड केल्याने ते संतापले आणि असे करणाऱ्यांना ताकीद दिली आहे. गेल्या दोन दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओवरुन गडकरी संतापले आहेत.

गडकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज पुन्हा काही माध्यमे, सोशल मीडिया आणि व्यक्तींनी माझ्या वक्तव्यांचा वापर करत माझ्याविरुद्ध वाईट आणि बनावट प्रचार करून राजकीय फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला आहे. सरकार, पक्ष आणि मेहनत घेणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. मी या व्हिडिओत काय म्हणालो आहे, याची लिंक मी शेअर करत आहे, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांच्या विरोधात दिली तक्रार

Shambhuraj Desai News | मविआ फुटणार! ठाकरे आणि पवारांच्या पक्षाला पुन्हा गळती लागणार? देसाईंचा मोठा गौप्यस्फोट

Nashik Onion News | कपडा हटवला, नियम मोडला, घोषणा दिल्या! नाशकात काय घडलं?

Eknath Shinde News | राऊतांच्या 'त्या' आरोपांमुळे पोलिसांनी थेट मुख्यमंत्र्याची बॅंगा तापसल्या!

Mhada Pune: आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT