bala bhegade- sunil shalke. 
मुंबई/पुणे

Bala Bhegde Vs Sunil Shelke: महायुतीत बंडाचा झेंडा! भाजपच्या बाळा भेगडेंचे सुनिल शेळकेंना आव्हान; राष्ट्रवादीचा प्रचार न करण्याचा ठराव

Gangappa Pujari

मावळ, ता. ३ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागताच दावे- प्रतिदावे अन् कुरघोड्यांना ऊत आला आहे. विधानसभेचे जागा वाटप अन् चर्चा होण्याआधी महायुतीमध्ये बंडाचा झेंडा फडकला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेवर दावा करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

मावळमध्ये बंडखोरीचे संकेत

मावळ विधानसभेवरुन भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वाद पेटला आहे. मावळ विधानसभा हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, असे म्हणत बाळा भेगडे यांनी सुनिल शेळकेंना आव्हान दिले आहे. सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडे यांनी बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काल मावळ विधानसभा मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेत बाळा भेगडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

बाळा भेगडेंचे सुनिल शेळकेंना आव्हान

"स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं. म्हणून महायुतीमध्ये मावळ हा भाजपचा बालेकिल्ला होता आणि पुढेही राहिलं. अभी नही तो कभी नही, हीच वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर येणारी दिशा ठरवायची आहे," असं बाळा भेगडे यावेळी म्हणाले.

"ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला त्यांच्या कलेला उत्तर द्यायचं आता भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे. माझं एकच सांगण आहे, गेल्या घरी सुखी राहा," असा टोला त्यांनी लगावला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळमध्ये सुनिल शेळकेंना उमेदवारी दिली तर प्रचार करायचा नाही, असा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT