Ashish Shelar Threat Letter Saam Tv
मुंबई/पुणे

Ashish Shelar Threat : आक्रमक राहिलात तर जीवे मारून समुद्रात फेकू, आशिष शेलार यांना पत्राद्वारे धमकी

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे, साम टीव्ही

Ashish Shelar Threat Letter : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आलं होतं. त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

काय आहे धमकीच्या पत्रात?

भाजपा नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

प्राप्त माहितीनुसार, आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या वांद्रे येथील कार्यालयात हे पत्र आलं आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले. याबाबत आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली.(Latest Marathi News)

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून हे हस्ताक्षर कोणाचं आहे, कोणत्या पोस्टऑफिसमधून हे पत्र आलं आहे, याचा तपास आता पोलीस (Police) करत आहेत. दरम्यान, आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र प्राप्त होताच, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

SCROLL FOR NEXT