Nilesh Rane Vs Deepak Kesarkar Saam TV
मुंबई/पुणे

'नोकरी नीट मागा, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी'; निलेश राणेंची केसरकरांवर जहरी टीका

राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली होती असा आरोप केसरकरांनी काल केला होता.

Jagdish Patil

मुंबई : 'दिपक केसरकर म्हणतो, मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. अशा अपमानजनक शब्दांमध्ये भाजपनेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर टीका केली आहे.

दीपक केसरकर आणि भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील राजकीय मतभेद सर्वांना माहिती आहेत. त्यांच्यामध्ये अधूनमधून शाब्दीक चकमकी देखील होत असतात. अशातच आता दीपक केसरकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बदनामी केली होती. राणेंच्या या कृत्याबद्दल आपण पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली होती असं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितं होतं.

त्यानंतर राणे-केसरकर यांच्या वादात पुन्हा ठिणगी पडली होती. शिवाय आपण राणे यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचंही केसरकर म्हणाले आहेत. अशातच आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांनावर टीका करणाऱ्या राणे पुत्रांनी नेहमीप्रमाणे निशाणा साधत अपमानजनक शब्दांमध्ये केसरकरांवर टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ -

याबाबत त्यांनी ट्विट केलं असून त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे असं ट्विट करत त्यांनी केसरकरांवर टीका केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT