Dipali Sayyed On Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

भाजप आमचा शत्रू नाही, दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

'भाजपा आमची शत्रु नाही आणि त्यांच्या विरुध्द आम्हाला बोलण्यास आनंदही नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेला सोडून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

मागील अडीच वर्षांपासून एकमेकांवरती टीका करताना सेना-भाजपच्या नेत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तेच नेते आता एकमेकांविरोधात टीका करताना मवाळ भूमिका घेत असल्याचं दिसतं आहे. तसंच नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी देखील आता मुख्यमंत्री शिंदे आपणाला आदरणीय आहेत, भाजप (BJP) आमचा शत्रू नाही आणि त्यांच्या विरुध्द बोलण्यात आम्हाला आनंदही होत नाही.' असं ट्विट केल्यामुळे शिवसैनिकांच्या मनातील संभ्रम आणखी वाढला आहे.

दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील, पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे अन्य दोन वाचाळविर आदरणीय उध्दव साहेब व शिवसेनेवर (Shivsena) टिका करतील तर त्यांना एवढच सांगणे आहे कि, आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे.

उगाच कळ काढु नका, आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमचा शत्रू नाही आणि त्यांच्या विरुध्द बोलण्यास आम्हाला आनंदही नाही परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे. असं ट्विट सय्यद यांनी केलं आहे.

एकीकडे भाजपमुळे शिवसेनेला खिंडार पडलं असून सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने सर्व मार्गांचा अवलंब करत कपटाने सत्ता काबीज केली असल्याचं सेनेतील वरिष्ठ नेते म्हणत असतानाच सय्यद यांनी एकनाथ शिंदेचे कौतुक करत भाजप आमचा शत्रू नसल्याचं ट्विट केलं आहे. हे नक्की कशाचे संकेत आहेत, याबाबत शिवसैनिकांना काही कळायला मार्ग नाही.

दरम्यान, एकीकडे दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं म्हटलं आहे. 'माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी एकनाथ शिंदे यांना मिळाली या गोष्टीचा आज मला पश्चाताप होत आहे. माझ्या आयुष्यातील हे मोठ पाप झालं की, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना शिंदेना उमेदवारी द्या असं सांगितलं. जर मी सांगितलं नसतं तर, शिंदेंना आमदारकी मिळाली नसती असंही राऊत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT